महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
आष्टी : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. मुसने यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दोन्ही महान नेत्यांच्या जीवनकार्याची व राष्ट्रसेवेची माहिती देण्यात आली. सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवा या त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.
जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. पांडे, दीपक खोब्रागडे व प्रभाकर भोयर यांनी परिश्रम घेतले. सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्वयंसेवक स्नेहा, जयश्री वेलादी, विकी मडावी, मानसी, वैष्णव कन्नाके, नरोटे, काशिनाथ तसेच इतर स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानात विशेष पुढाकार घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, सेवाभाव, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत झाली.
Tags:
शिक्षण विभाग