भगवंतराव महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी
एटापल्ली (प्रतिनिधी):
स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती तसेच 'जागतिक अहिंसा दिन' अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुधीर भगत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा. डॉ. विनोद पत्तीवार डाॅ निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. राजीव डांगे, सहायक रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ श्रृती गुब्बावार, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डाॅ. स्वाती तंतरपाळे, प्रा. अतुल बारसागडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्षांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या आणि लालबहादुर शास्त्री यांच्या 'जय जवान, जय किसान' या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली व आपल्या दैनंदिन जीवनात अहिंसा, सत्य आणि शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल ढबाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. चिन्ना पुंगाटी यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
शिक्षण विभाग