एटापल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला संघटन बळकट करण्यासह आगामी उपक्रमांवर चर्चा; तालुक्यातील महिला पदाधिकारी व सदस्यांची मोठी उपस्थिती
जनार्दन नल्लावार एटापल्ली प्रतिनिधी
एटापल्ली, दि. १ ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एटापल्ली येथे गुरुवारी महिला आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथे झालेल्या या बैठकीला तालुक्यातील महिला पदाधिकारी व सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. हर्षवर्धनराव बाबा आत्राम होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. पुष्पाताई आलोने आणि सौ. सारिकाताई गटपल्लीवार उपस्थित होत्या.
यावेळी सौ. बेबी ताई नरोटी, माजी सभापती, पंचायत समिती एटापल्ली, सौ. पौर्णिमाताई श्रीरामवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा, एटापल्ली तसेच श्री. संभाजी हिचामी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष, उपस्थित होते.
बैठकीस श्री. सुरेंद्रभाऊ आलोने, श्री. नागेशभाऊ मडावी, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहेरी, श्री. जनार्धनभाऊ नलावर, श्री. रेजू गावडे, श्री. लक्ष्मणभाऊ नरोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सौ. शालिनी नेताम, सौ. रेहाना शेख, सौ. कालिमा शेख, सौ. मनीषा नडामवार, सौ. वंदना तुंकलवार, सौ. ज्योती डोमलवार यांच्यासह एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान महिला संघटन मजबूत करणे, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच तालुक्यातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. महिला पदाधिकारी व सदस्यांनी पक्षाच्या आगामी कामकाजाबाबत आपली मते मांडली.
महिलांची संघटनात्मक ताकद वाढवून पक्षाचा जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
Tags:
राजकारण