तिसरी शिक्षण परिषद उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना मार्गदर्शन

तिसरी शिक्षण परिषद उत्साहात; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना मार्गदर्शन

मुधोली चक नं. २ येथे विविध शैक्षणिक उपक्रमांवर सखोल चर्चा; निपुण भारत, UDISE+ व SMC सक्षमीकरणावर भर

मुधोली चक नं. २ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुधोली चक नं. २, समूह साधन केंद्र गणपूर (रे) येथे दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तिसरी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. परिषदेत शिक्षकांना विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व उद्घाटनाने झाली. त्यानंतर आनापान साधना, निपुण भारत अभियान, PGI व UDISE+ डेटा भरणे, तसेच शालेय व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिषदेदरम्यान शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवित अध्यापन पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षकांनी नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
समारोप सत्रात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्याचा संदेश देण्यात आला. या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्ञानात निश्चितच भर पडली असून, त्याचा सकारात्मक परिणाम शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस होईल, असे मत गणपूर केंद्राचे केंद्रप्रमुख कपिल सहारे यांनी व्यक्त केले.
परिषदेमुळे शिक्षकांना शैक्षणिक कामकाजातील विविध बाबींचे मार्गदर्शन मिळाल्याने आगामी काळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने