फुले महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा
आष्टी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ३ ऑक्टोबर रोजी वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सवलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभागाच्या वतीनेअभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मुसणे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक युवा कवी संकल्प करिअर अकॅडमी चे संचालक अमोलजी बोरकुटे, डॉ.संजय फुलझेले ,डॉ. भारत पांडे ,डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. गणेश खुणे, डॉ. ज्योती बोबाटे, प्रा. रवी गजभिये उपस्थित होते. मार्गदर्शक अमोल बुरकुटे यांनी मराठी भाषेचा गोडवा कथन केला. आपल्या प्रदेशातील जी बोली आहे त्या बोलीला जोपासण्याचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले .शिवाय स्पर्धा परीक्षा करिता मराठी भाषेची उपयुक्तता ही सोदाहरण विद्यार्थ्यांना स्पष्ट केली. अमोल बोरकुटे यांनी स्वलिखित कविता सादर करून बोलीचे महत्त्व पटवून दिले अध्यक्ष भाषणातून डॉ. राजकुमार मुसणे यांनी मराठी भाषेची प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्यसंपदा, संतवाङ्मय, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक वारसाचे जतन व संवर्धन व्हावे, सर्वांनी परंपरेचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ .ज्योती बोबाटे यांनी तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी रवी गजभिये यांनी मानले.
Tags:
शिक्षण विभाग