आष्टीत पंदिलवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन
आष्टीतील धार्मिक परंपरेला डॉ. नेते यांची उपस्थिती; भक्तिभावाने पूजा-अर्चा करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा
गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६ :
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आष्टी, चामोर्शी, सावली व गडचिरोली परिसरातील विविध ठिकाणी भेटी देत घरगुती तसेच सार्वजनिक गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली तसेच उपस्थितांना गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आष्टी येथे सामाजिक नेते संजय पंदिलवार यांच्या निवासस्थानी विराजमान महालक्ष्मीचे डॉ. नेते यांनी दर्शन घेतले. त्यानंतर चामोर्शी येथील निवृत्त न्यायाधीश दीक्षित साहेब यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीचे पूजन व दर्शन घेतले. गडचिरोली शहरातील माधुरी श्रीकांत केदार यांच्या निवासस्थानी आयोजित महालक्ष्मी पूजनात सहभागी होत त्यांनी देवीचे दर्शन घेतले.
चामोर्शीत गणरायाचे दर्शन
चामोर्शी शहरातही डॉ. अशोकजी नेते यांनी विविध कुटुंबांच्या निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. भाजपा तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे तसेच भाजपा युवा नेते नरेश अल्सावार यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पाची पूजा-अर्चा करून दर्शन घेतले.
सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे भेट
सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे भाजपाचे युवा नेते नामदेवराव भोयर यांच्या निवासस्थानी भेट देत डॉ. नेते यांनी विराजमान गणपती बाप्पाची पूजा-अर्चा केली व मनोभावे दर्शन घेतले.
*गडचिरोली शहरात विविध ठिकाणी घरगुती गणपती बाप्पा चे दर्शन*
गडचिरोली शहरातील विविध ठिकाणीही डॉ. अशोकजी नेते यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटी दिल्या. भाजपा ज्येष्ठ नेते गजानन यनगंदलवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, सामाजिक नेते कुणाल पेंदोरकर, कनेरी येथील आकाश लक्ष्मणराव कावडे, तसेच इंदाळा येथील पंकज बोबाटे मेजर यांच्या निवासस्थानी आयोजित गणेशोत्सवाला भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी विराजमान श्री गणराय व महालक्ष्मीचे भक्तिभावाने दर्शन घेत पूजा-अर्चा केली. गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, या पवित्र पर्वातून सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांशी त्यांनी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags:
धार्मिक