गोटामी कुटुंबाच्या दुःखात धावले डॉ. अजय कंकडालवार

गोटामी कुटुंबाच्या दुःखात धावले डॉ. अजय कंकडालवार

कारका खुर्द येथील शोकाकुल कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत; प्रज्वल नागूलवार यांच्या पुढाकारातून माणुसकीचा हात

राकेश तेलकुंटलवार/उपसंपादक 
महाराष्ट्र प्रहार न्यूज 

एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम कारका खुर्द येथील गोटामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लंकेश गोटामी यांचे वडील अडवे नेवरू गोटामी यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अंत्यसंस्कार व पुढील विधींच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता.

गोटामी कुटुंबाची ही अडचण तालुका काँग्रेसचे नेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ ही बाब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्यापर्यंत पोहोचवली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. कंकडालवार यांनी विलंब न करता गोटामी कुटुंबासाठी तातडीची आर्थिक मदत पाठवून दुःखाच्या प्रसंगी आधार दिला.

ही मदत प्रज्वलभाऊ नागूलवार यांच्या माध्यमातून गोटामी कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आली. अचानक आलेल्या संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे शोकाकुल कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

दुर्गम भागातील गरीब व गरजू कुटुंबाच्या अडचणीची माहिती मिळताच तत्काळ मदतीचा हात पुढे केल्याने डॉ. अजय कंकडालवार यांच्या या भूमिकेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. दुःखाच्या प्रसंगी केवळ सहवेदना न व्यक्त करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे, हीच माणुसकीची खरी ओळख असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

डॉ. कंकडालवार यांच्या मदतीबद्दल गोटामी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

यावेळी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर गोटा, जवेलीचे उपसरपंच दामजी हिचामी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सचिव स्वप्नील कनकलवार, दिनेश वड्डे, जवेलीच्या सरपंच अलिशा गोटा, दुलसा गावडे पाटील, कान्हालगाव पाटील मणिराम नरोटे, पेंदुलवाहीचे पाटील बंडू हिचामी, कोहकाचे उपसरपंच अंतू नरोटे, नेवरा मटामी, रोपीचे पाटील राकेश नरोटे, अण्णा गावडे, नेवसू नरोटे, नरेश गावडे, मंकू गोटामी, विठ्ठल गोटामी, मुरलीधर कुंभमवार, रमेश गोटामी यांच्यासह ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने