सराईत दारु विक्रेत्यांना 01 वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्रातून करण्यात आले हद्दपार



सराईत दारु विक्रेत्यांना 01 वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्रातून करण्यात आले हद्दपार


गुन्हेगारी पाश्र्वभूमी असणा­या सवयीच्या 05 गुन्हेगारांना गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्रातून केले हद्दपार 
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई

 गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीस आळा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने सराईत दारु विक्रेत्याविरोधात प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी दिलेले आहेत. त्याअनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानूसार पोलीस स्टेशन देसाईगंज, आरमोरी हद्दीतील एकूण 05 सराईत गुन्हेगारांना गडचिरोली जिल्ह्रासह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथून 01 वर्ष कालावधी करीता हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत असे आहे की, पोलीस स्टेशन देसाईगंज हद्दीतील सराईत गुन्हेगार नामे 01) रजनी रामचंद्र आत्राम, वय 49 वर्ष, रा. गांधीवार्ड देसाईगंज, जि. गडचिरोली 02) नंदाबाई हरिदास शिंगाडे, वय 48 वर्ष, रा. कुरुड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली 03) संगिता वामन जांभुळकर, वय 51 वर्ष, रा. विसोरा बर्डी, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली, याचे विरुध्द अवैध दारु विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे केल्याची नोंद पोस्टे देसाईगंज येथे आहे. संबधीत आरोपींविरूद्ध पोस्टे देसाईगंज येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम 65 व इतर कलमानूसार अक्र. 01 व 02 यांच्यावर 15 तसेच अक्र. 03 यांच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. 
यासोबतच पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील सराईत गुन्हेगार नामे 01) ईश्वरदास देविदास खेडेकर, रा. देलनवाडी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली 02) सुनिल रामचंद्र जिभकाटे, रा. शेगांवटोली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याचे विरुध्द अवैध दारु विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे केल्याची नोंद पोस्टे आरमोरी येथे आहे. संबधीत इसमांविरुध पोस्टे आरमोरी येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम 65 व इतर कलमानूसार अनुक्रमे 08 व 11 गुन्हे दाखल आहेत. 
 वर नमुद इसमांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे वारंवार दाखल होऊन सुद्धा संबधित आरोपी इसमांमध्ये कुठलाही बदल झालेला नसल्याचे दिसून आल्याने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे संबधित आरोपीविरुध्द हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, देसाईगंज (वडसा) यांचेकडून सदर प्रस्तावाबाबत चौकशी करण्यात येऊन चौकशीअंती सदर सराईत गुन्हेगारांच्या हालचाली समाजातील नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका किंवा इजा निर्माण होण्याचा दाट संभव आहे अशी खात्री झाल्याने तसेच त्याची इतर गुन्ह्रांची पाश्र्वभूमी आणि सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (ब) अन्वये सराईत गुन्हेगार यांना गडचिरोली जिल्ह्रासह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्हातून 01 वर्षाकरीता हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, देसाईगंज (वडसा) यांनी दिले आहेत. सदर आरोपीने तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याला अटक करुन त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार. 
यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी सांगितले आहे की, ‘गडचिरोली जिल्ह्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा बेकायदेशिर व्यवसाय करणा­या सराईत गुन्हेगारांविरोधात सातत्याने अधिक सक्तिने कठोर कारवाई करण्यात येणार असून, यापूढे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई व तडीपार याप्रमाणे कठोर कारवाईचा अंमल करण्यात येणार आहे.’ 
 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक, (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे. देसाईगंज चे प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्निल ईज्जपवार, पोस्टे. आरमोरी चे प्रभारी अधिकारी पोनि. सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अनिल देरकर, पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
थोडे नवीन जरा जुने