पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- भारतीय जनसंघाचे प्रमुख विचारवंत तथा एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती चामोर्शी येथील माजी आमदार तथा भाजपा आदिवासी आघाडीचे  प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता, अंत्योदय आणि एकात्म मानववादाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचला पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या जीवनातून कार्यकर्त्यांनी राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि संघटनात्मक कार्याची प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर नागरिकांना प्रेरणा मिळत असून, या कार्यक्रमातून प्रत्येकाने चांगले विचार आणि आदर्श आत्मसात करावा, असे आवाहन डॉ. होळी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा महामंत्री किसान आघाडीचे साईनाथजी बुरांडे, ज्येष्ठ नेते जैराम चलाख, युवा नेते प्रतीक राठी, राकेश भैसारे, सुनील सोरते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचे स्मरण करत राष्ट्रहित, समाजहित आणि वंचित घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
थोडे नवीन जरा जुने