महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या उत्पादन व साठवणूक करणा-या आरोपींविरोधात गडचिरोली पोलीसांची कारवाई
04 आरोपीसह सुगंधित तंबाखू मुद्देमाल, उत्पादन साहित्य व चारचाकी वाहन पोलीसांनी घेतले ताब्यात
श्व् एकूण 22 लाख 50 हजार 230 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणायांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ला देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पोलीसांनी सुगंधित तंबाखूची अवैधपणे साठवणूक व उत्पादन करणाया आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 18/09/2026 रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पोलीस पथकाला गोपनिय बातमिदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे अजीत कुजुर, रा. जांभळीझोरा, ता. धानोरा, जि. गडचिरोली हा आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु बेकायदेशिर तयार करुन विक्री करीत आहे. सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) पोलीस पथकाने नमूद इसम नामे अजीत कुजूर यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन त्याच्या घराची व आजुबाजूच्या परिसराची पंचासमक्ष पाहणी घेतली असता, घरामध्ये एका चुंगळीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखुचा साठा केल्याचे आढळुन आले तसेच पॅकींग करीता लागणारे इतर साहित्य सुद्धा मिळून आले. त्यानंतर पोलीस पथकानी आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली असता, घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाच्या मागच्या सिटच्या खाली दोन पिवळ्या व दोन पांढया रंगाच्या चुंगळीमध्ये सुगंधित तंबाखु मिळून आले. यावरुन सदर घरातून व वाहनातून 1) सुगंधीत तंबाखु असलेल्या एकूण 103 पांढया रंगाच्या चंुगळ्या एकूण किंमत 12,05,380/- रुपये, 2) सुगंधीत तंबाखु 02 पांढया व 02 पिवळ्या रंगाच्या चंुगळीत असलेले एकूण किंमत 3,05,100/-, 3) एका पिवळ्या रंगाच्या चंुगळीमध्ये मजा 108 हुक्का शिसा तंबाखू असे लिहीलेले एकूण 10 पॉलीथीनचे पॅकेट एकूण किंमत अंदाजे 13,250/- रुपये, 4) पॅकींग करीता लागणारे साहित्य ज्यामध्ये केकेपी लिहिलेले बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटीक फिल्म सिलींग मशिन, पोर्टेबल बॅग शिलाई मशिन, स्टरेटनर मशिन सर्व एकूण किंमत अंदाजे 1,25,500/-, 5) एक पांढया रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्र. एम एच 33 ए.सी. 5170 जुने वापरती अंदाजे किंमत 6,00,000/- रुपये असा एकूण 22,50,230/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी नामे 1) अजीत जोहन कुजूर याचेकडे सदर मुद्देमालाबाबत सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थळावरून फरार आरोपीचे नाव 2) प्रशांत याडवार, रा. ता. व जि. गडचिरोली असे सांगितले व सर्व मुद्देमाल हा प्रशांत याडवार याचा असून त्यांच्या घरी हजर असलेले आरोपी 3) साईनाथ टाटाजी कन्नाके, 4) सचिन ज्ञानेश्वर कन्नाके दोघेही रा. ढोरप, ता. पवनी, जि. भंडारा तसेच 5) अभिजित यादव नान्हे रा. उमरेड जि. नागपूर हे त्याचे साथीदार असल्याचे त्यानी सांगितले.
यावरुन सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरुन पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथे आरोपी 1) अजीत जोहन कुजूर, वय 22 वर्ष, रा. जांभळीझोरा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, 2) साईनाथ टाटाजी कन्नाके, वय 39 वर्षे, 3) सचिन ज्ञानेश्वर कन्नाके, वर्षे 32 वर्षे दोघेही रा. ढोरप, ता. पवनी, जि. भंडारा, 4) अभिजित यादव नान्हे रा. उमरेड जि. नागपूर व फरार आरोपी क्र. 5) प्रशांत याडवार, रा. ता. व जि. गडचिरोली यांचेविरुध्द अपराध क्रमांक 54/2026 कलम – 3(5), 275, 274, 223, 123 भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम – 59 (त्), 3(1)(न्न्न्न्)(ध्), 27(3)(ड्ढ), 26(2)(त्), 26(2)(त्ध्) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्रातील 04 आरोपींताना दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्रातील फरार आरोपी प्रशांत याडवार याचा शोध सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. दयानंद भोंबे, पोमकें गट्टा (फु.) हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज. जी., सहा. पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. सुयश कुमार सिंग यांचे मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) चे पोउपनि. दयानंद भोंबे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
Tags:
पोलिस विभाग