कोरचीत दहीहंडी उत्साहात, गौरी चौकच्या चमूने पटकावले पारितोषिक

कोरचीत दहीहंडी उत्साहात, गौरी चौकच्या चमूने पटकावले पारितोषिक

जितेंद्र सहारे /प्रतिनिधी 
कोरची 

कोरची :- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कोरची येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
              उत्सवाची सुरुवात सकाळी श्रीकृष्ण पूजनाने झाली. त्यानंतर हवन व धार्मिक विधी पार पडले. पुढे गोपाळकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
              दहीहंडी फोडण्यासाठी गौरी चौक, दर्रोटोला आणि कोचिनारा येथील चमूंनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी चमूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. उपस्थित नागरिकांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
             अखेर गौरी चौकच्या चमूने दहीहंडी फोडत पारितोषिक पटकावले. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
               उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम शांततेत पार पडला.
              दहीहंडी उत्सवानंतर उपस्थित नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरण, गोविंदा पथकांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कोरचीतील दहीहंडी उत्सव संस्मरणीय ठरला.
थोडे नवीन जरा जुने