मार्कंडा (कं) येथे बावणे कुटुंबीयांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

मार्कंडा (कं) येथे बावणे कुटुंबीयांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

वडिलोपार्जित परंपरेला यंदाही उजाळा; भजन-दिंडीने गावात भक्तिमय वातावरण

मार्कंडा (ता. चामोर्शी) | दि. ६ सप्टेंबर २०२६ :
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं.) येथे तबला वादक प्रभाकर बावणे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बावणे कुटुंबीयांकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वडिलोपार्जित परंपरेचे यंदाही श्रद्धेने पालन करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बावणे यांच्या घरी विधिवत घटस्थापना करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी न चुकता हा उत्सव साजरा केला जात असल्याचे प्रभाकर बावणे यांनी सांगितले. घटस्थापनेपासून दुसऱ्या दिवशी धार्मिक विधी पार पाडून घटाचे विसर्जन करण्यात येते.

या उत्सवात गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने भजन-दिंडीचे आयोजन करण्यात येते. टाळ-मृदंगाच्या गजरात तसेच भक्तिमय वातावरणात दिंडीची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गावात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

बावणे कुटुंबीयांनी जपलेली ही वडिलोपार्जित परंपरा आजही श्रद्धा आणि उत्साहाने सुरू असून, नव्या पिढीलाही या परंपरेची ओळख करून देण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. गावकऱ्यांचा मिळणारा सहभाग हीच या उत्सवाची विशेष बाब ठरत आहे.
थोडे नवीन जरा जुने