चंद्रपूर येथे आनंदराव अलोने यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव

चंद्रपूर येथे आनंदराव अलोने यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव

राकेश तेलकुंटलवार/उपसंपादक 

चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित ‘उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आनंदराव मनीराम अलोने यांचा ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अलोने यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांत सक्रिय योगदान दिले आहे. गेल्या ३४ ते ३५ वर्षांपासून त्यांनी गडचिरोली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, लोकसंख्या शिक्षण तसेच शैक्षणिक साहित्य व प्रतिकृती निर्मितीच्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.
वेध प्रतिष्ठान, नागपूरच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांनी प्रथम पुरस्कार पटकावला आहे. तसेच सायन्स फाऊंडेशन महाराष्ट्र, पुणे यांच्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत त्यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सुमारे ३५ वर्षे जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केले असून, जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत २०२०-२१ मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेत २०१३-१४ मध्ये आदर्श पुरस्कार तसेच राज्यस्तरीय मराठी प्रथम भाषा उपक्रमात जालना व नागपूर येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, कर्तृत्व आणि समर्पित सेवाभावातून अलोने यांनी केलेले कार्य शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
थोडे नवीन जरा जुने