गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी मणीकंठ गादेवार यांची नियुक्ती
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या नियुक्तीने समर्थक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
एटापल्ली :सामाजिक, जनहिताच्या प्रश्नांसाठी तसेच भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविणारे मणीकंठ प्रमोद गादेवार यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल दादा देसले यांच्या स्वाक्षरीने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.
नियुक्तीपत्रात सामाजिक, जनहिताच्या व भ्रष्टाचारविरोधी चळवळीत केलेल्या सक्रिय सहभागाची दखल घेत गादेवार यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शासकीय योजनांचा लाभ, नागरिकांचे हक्क व अधिकार, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांसंदर्भात प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार गादेवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीची माहिती समोर येताच एटापल्लीसह गडचिरोली जिल्ह्यातील मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा ओघ सुरू असून, त्यांच्या नव्या जबाबदारीतून जनहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” असा निर्धार मणीकंठ गादेवार यांनी व्यक्त केला.
Tags:
एटापल्ली