खरीप हंगामी पैसेवारी ६७ पैसे जाहीर
गडचिरोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : गडचिरोली जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. पीक असलेल्या १,५७२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
तहसीलदारांकडून प्राप्त माहिती संकलित करून ही हंगामी पैसेवारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १,६८८ गावे असून, त्यापैकी १,६२२ गावे खरीप पिकांची आहेत. या खरीप गावांपैकी ५० गावांमध्ये पीक नसल्याने उर्वरित १,५७२ गावांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोनतृतीयांश क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झालेली चार रब्बी गावेही जिल्ह्यात आहेत.
Tags:
गडचिरोली