महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेचे संपन्न

महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेचे संपन्न

आष्टी येथे धनुर्विद्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यापीठातील मान्यवरांची उपस्थिती
आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे दिनांक ८ व ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुरुष व महिला गटातील आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मुसने होते. स्पर्धेचे उद्घाटन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचे प्राचार्य श्री. किशोर पाजभाई, खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथील डॉ. आशिष सहारे, भगवंतराव महाविद्यालय, सिरोंचा येथील प्रा. डॉ. उरकुडे, प्रा. डॉ. फुलझेले, प्रा. डॉ. खुणे, प्रा. डॉ. शास्त्रकार उपस्थित होते.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे सिनेट सदस्य डॉ. नरवडे मॅडम तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या व संचालक डॉ. प्रिया गेडाम मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
धनुर्विद्या हा एकाग्रता, संयम, अचूकता आणि आत्मविश्वास यांचा कस पाहणारा क्रीडाप्रकार आहे. लक्ष्यावर नेम साधताना खेळाडूला शारीरिक कौशल्यासोबतच मानसिक स्थैर्यही आवश्यक असते. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळतो, त्यांच्यात खिलाडूवृत्ती विकसित होते आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे ही विशेष अभिमानाची बाब आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. श्याम कोरडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती बोभाटे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संबंधित क्रीडा विभागाने सहकार्य केले.
थोडे नवीन जरा जुने