पौर्णिमा श्रीरामवार यांनी छोट्या मुलांसोबत साजरा केला वाढदिवस



पौर्णिमा श्रीरामवार यांनी छोट्या मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

स्वामी विवेकानंद छात्रावासात केक कापून आनंदोत्सव; विद्यार्थ्यांना पेन व पुस्तकांचे वाटप

एटापल्ली : राकेश तेलकुंटलवार/ उपसंपादक 

आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू आणि छोट्या मुलांसोबत वाटून घेत पौर्णिमा शैलेश श्रीरामवार यांनी सामाजिक बांधिलकीचा सुंदर परिचय दिला. स्वामी विवेकानंद छात्रावासात छोट्या मुलांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी पौर्णिमा श्रीरामवार यांनी छात्रावासातील मुलांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, वाढदिवसानिमित्त मुलांना पेन व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

या उपक्रमामुळे वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य देत मुलांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

पौर्णिमा श्रीरामवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मैत्रिणी गुलशन शेख, सुनीता चांदेकर, कलिमा शेख, रेहाना शेख, बेबीताई नरोटे, वंदना आईंचेवार, छाया जेट्टी आणि आनंदी नरोटे यांची उपस्थिती होती. मैत्रिणींनी पौर्णिमा श्रीरामवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

केक कापणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शुभेच्छा आणि हास्य-विनोदामुळे छात्रावासातील वातावरण आनंदमय झाले होते. छोट्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करून पौर्णिमा श्रीरामवार यांनी आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला.

यावेळी उपस्थितांनी पौर्णिमा श्रीरामवार यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
थोडे नवीन जरा जुने