नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चर्चेसाठी बैठक घेण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आश्वासन

गडचिरोली : महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना, रजिस्टर क्रमांक ३१३०, शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील नर्सेस भगिनींच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देण्यापूर्वी वीर बाबुराव शेडमाके सभागृहात राज्याध्यक्ष चिलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नर्सेस संघटनेच्या नवीन कार्यकारिणीचा परिचय करून देण्यात आला. तसेच नर्सेसच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या आठवड्यात संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले.

यावेळी महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे राज्याध्यक्ष चिलबुले, जी.प. महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कवीश्वर बनपूरकर, नर्सेस संघटना ३१३०च्या जिल्हाध्यक्ष मंगला चंदनखेडे, उपाध्यक्ष संगीता सरोदे, जिल्हा सचिव शर्मिला जनबंधू, कार्याध्यक्ष छायाताई मानकर, दामोधर पटले, ठाकरे सर, खुशाल नेवारे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने