भगवंतराव महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
राकेश तेलकुंटलवार /उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली - आज दिनांक ५ सप्टेंबर ला भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा सांस्कृतिक विभागातर्फे भारताचे माजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ एस. एन. बुटे यांच्या हस्ते डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्विप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांव्दारे सर्व प्राध्यापक वृंदांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
'शिक्षक दिन हा केवळ एक सण किंवा औपचारिक कार्यक्रम नसून, तो शिक्षकांविषयी कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक पवित्र दिवस आहे. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे माध्यम नसून, ते विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करणारे, त्यांच्यातील गुणांना पैलू पाडणारे आणि त्यांना एक जबाबदार नागरिक बनवणारे शिल्पकार असतात'. असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्राचार्य डॉ एस. एन. बुटे यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी प्रा. डाॅ. सुधीर भगत व प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ संदिप मैद, प्रा. विनोद पत्तीवार, प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार, प्रा डाॅ निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. राजीव डांगे, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, सहायक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रृती गुब्बावार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल ढबाले, सहायक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा चिन्ना पुंगाटी,प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डाॅ. स्वाती तंतरपाळे, प्रा. अतुल बारसागडे, श्री श्रीनिवास पेंडलवार, श्री. बब्बू शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ऋषीत लेकामी तर आभार प्रदर्शन दिनेश मट्टामी याने केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Tags:
शिक्षण विभाग