एन. टीव्ही.न्युज मराठी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी शंकर मुत्येलवार यांची भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

एन. टीव्ही.न्युज मराठी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी शंकर मुत्येलवार यांची भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अहेरी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग या पदावर अहेरी येथील शंकर मुत्येलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापुस्कर बाबाआणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंल दादा दसाल विभागीय अध्यक्ष श्री माननीय शंकर भाऊ ढोलगे यांच्या स्वाक्षरीने २८ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शंकर मुत्येलवार यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण विभागाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली असून, पुढील आदेशापर्यंत त्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी तसेच भ्रष्टाचाराविरोधात संघटनात्मक पातळीवर कार्य करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.



या नियुक्तीबद्दल शंकर मुत्येलवार यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, दक्षिण गडचिरोली भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
थोडे नवीन जरा जुने