दारू सोडा, संसार जोडा; २३ जणांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

दारू सोडा, संसार जोडा; २३ जणांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

विहिरगाव येथे राष्ट्रसंत शेषराव महाराज व्यसनमुक्तीपर सत्संग

गोंडपिपरी, १२ सप्टेंबर : “दारू सोडा, संसार जोडा आणि सुखी जीवन जगा” या संदेशातून विहिरगाव (ता. गोंडपिपरी) येथील राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज नवनिर्मित मंदिरात शुक्रवारी (११ सप्टेंबर) व्यसनमुक्तीपर सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या सत्संगात विविध गावांतील २३ जणांनी कायमस्वरूपी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला.

सत्संगाच्या अध्यक्षस्थानी तथा प्रमुख मार्गदर्शक गणपती चौधरी गुरुजी होते. त्यांनी राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याची माहिती देत व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त जीवनातून कुटुंबात आनंद, समाधान आणि स्थैर्य निर्माण होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाला प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना, गोंडपिपरीचे कार्याध्यक्ष मुन्नाजी सिडाम तसेच उपाध्यक्ष बालुभाऊ (प्रभाकर) पिंपळशेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नव्याने व्यसनमुक्तीचा संकल्प करणाऱ्या शिवभक्तांना शुभेच्छा देत व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले.

२३ जणांचा व्यसनमुक्तीचा निर्धार

सत्संगादरम्यान समीर मेंडे (नागपूर), विनोद भडके (दहेली), विजय घोडाम (पारगाव), महेंद्र गायकवाड (चंद्रपूर), विनोद मेक्कालवार व अविनाश बाकेवार (चापलवाडा), सुरेश साळवे (सरांडी), सचिन आदे (गोजोली), रविंद्र मोरे (साखरी), संदीप बदकी (चंद्रपूर), राम दुमावर (मूल), गोविंद हिरालालदास व आनंद हिरालालदास (विश्वनाथ नगर), दिवाकर भोयर (नवेगाव भुजला), साईनाथ आभारे (सगनापूर), संतोष येलक्का (बेलमपाल्ली), गुरूदास ठाकूर (आष्टी), विठ्ठल कामरे (चक पिपरी), लखन मंडल (विश्वनाथ नगर), प्रमोद धांडे, बबलू सेनानी, विजय माहोत (चंद्रपूर) आणि लालसिंग (घुघूस) यांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला.

या उपक्रमाला सुधाकर बांगरे, बंडू भोयर, मोहन गौरकार, मारोती नेवारे, युवराज परसोडे, लोमेश चहारे, गणेश गोहणे, मुन्ना पुडके, संजय पुडके, दीपक गौरकार, पिंपळशेडे बाबू, नितीन येलमुले, नितेश येलमुले, बंडू झाडे, अविनाश वाघमारे, गंगाधर मांडवगडे, खुशबराव मेधाडे, नितेश कोहपरे, सेवक राम चलाख, हरिदास हुलके, अनिल चौधरी, किशोर कोहपरे, प्रकाश झाडे, रोशन धोटे, सुधाकर बोरकुटे, दिलीप पोलोजवार, रायसिंग चव्हाण, नितेश चौधरी, भगीरथ बोरकुटे, अतुल बट्टे, योगेश आदे, शरद खरबनकर, दिनेश गौरकार, भास्कर धंढरे, साईनाथ लोणबले, गणपती मेधाडे, जनार्धन मेधाडे, हनुमान सिडाम, अशोक मोरे आणि शंकर बोलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

“व्यसनमुक्त होणे हा माणसाचा पुनर्जन्म आहे” या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या सत्संगामुळे व्यसनमुक्तीचा संदेश समाजात पोहोचविण्यास हातभार लागला. “दारू सोडा... संसार जोडा... सुखी जीवन जगा” असा संदेश यावेळी देण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने