गणेशोत्सव, पोळ्याच्या पार्श्वभूमीवर एटापल्लीत पोलिसांचा रूट मार्च


गणेशोत्सव, पोळ्याच्या पार्श्वभूमीवर एटापल्लीत पोलिसांचा रूट मार्च

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा शहरातून संचलन; अधिकारी-अंमलदारांचा सहभाग

राकेश तेलकुंटलवार/ उपसंपादक 
महाराष्ट्र प्रहार न्यूज 

एटापल्ली : गणेश स्थापना व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एटापल्ली पोलिसांकडून बुधवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्चला राजीव गांधी चौकातून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बस स्टॉप, शिवाजी चौक, संस्कार पब्लिक स्कूल परिसर, इंदिरा वॉर्ड, बंगाली कॅम्प, एसडीपीओ कार्यालय परिसर, संविधान चौक तसेच मशीद रोड मार्गे पोलिसांचे संचलन करण्यात आले.
रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी बर्गे, सहायक पोलिस निरीक्षक कैलास बेले, पोलिस उपनिरीक्षक पायघन, पोलिस उपनिरीक्षक सुर्वेसे तसेच महिला पोलिस उपनिरीक्षक शिरशिकर यांच्यासह पोलिस स्टेशनचे २१ अंमलदार, क्यूआरटीचे ८ अंमलदार आणि एसआरपीएफचे ८ जवान सहभागी झाले.
रूट मार्चपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी बर्गे यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, एटापल्ली शहरातील रूट मार्च शांततेत पार पडला.
थोडे नवीन जरा जुने