कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव कु. शुभम दिलीप धोटे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेच्या निकालात देशात ३९वा क्रमांक (AIR 39) मिळवत Assistant Commandant, CISF या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.
अवघ्या २५व्या वर्षी शुभमने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर उंच भरारी घेत त्यांनी आपल्या कुटुंबासह गावाचेही नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शुभम धोटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐🥳🥳
या यशाबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी, सावनेर माननीय सागरजी खर्डे यांनी शुभम धोटे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शुभमच्या यशाने कळमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे! 🇮🇳💐
Tags:
अभिनंदन