मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना धावली; सांत्वनासह आर्थिक मदतीचा हात

मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शिवसेना धावली; सांत्वनासह आर्थिक मदतीचा हात


आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला धीर, आर्थिक मदतीचा हात


राकेश तेलकुंटलवार /उपसंपादक 
महाराष्ट्र प्रहार न्यूज 
एटापल्ली :

तालुक्यातील अतिदुर्गम वाघेझरी येथील शिवसेनेचे बी.एल.ए. प्रमुख मनोज देवू कोवासे (वय ३२) यांचे ५ जुलै रोजी आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने कोवासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुःखद प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाघेझरी येथे जाऊन कोवासे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख आमदार मनीषाताई कायंदे आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, अक्षय पुंगाटी, वैद्यकीय मदत कक्ष अहेरी विधानसभा प्रमुख प्रकाश भाऊ गद्दलवार, अरुण शेडमाके, अंकुश मंडलवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी कुटुंबीयांना धीर देत शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. कार्यकर्ता अडचणीत असताना त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश शिवसेना नेतृत्वाने दिला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनोज कोवासे हे शिवसेनेचे सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. अतिदुर्गम भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या अकाली निधनाने कोवासे कुटुंबीयांसोबतच शिवसेना संघटनेचीही मोठी हानी झाल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

“मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील,” अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी नगरपंचायत एटापल्लीचे नगरसेवक नामदेव हिचामी, राघव सुलवावार, ग्रामपंचायत गुरुपल्लीचे सरपंच कैलास उसेंडी, विश्वनाथ जांभूकर सर, प्रशांत तलांडे, उपसरपंच बाळू आत्राम, नत्तू दुर्वा, रिषभ दुर्गे, महादेव हिरा, मिरवा मट्टामी, सुमित कर्माकर, सचिन गेडाम, सुरेश तलांडे, अमर बिश्वास, वैभव सोमणकर, आदित्य चिपावार आदींसह बहुसंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने