भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मध्यवर्ती रोपवाटिका, एटापल्ली येथे रोपवाटिका कार्यशाळेत सहभाग
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
एटापल्ली: - स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली आणि मध्यवर्ती रोपवाटिका, एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोंबर, 2026 रोजी रोपवाटिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेमध्ये मा. श्रीमती एन के खोब्रागडे , वनपरिक्षेत्र अधिकारी आणि मा. श्री बी डी राठोड क्षेत्र सहाय्यक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वनस्पतींची रोपे कशी तयार करायची, माती रेती आणि शेणखत याचे प्रमाण किती ठेवायचे आणि रोपांच्या वाढ व सुरक्षितेसाठी कोणती रासायनिक खते आणि औषधे वापरायची याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रोपवाटिके संदर्भातील प्रात्यक्षिके श्री. आर के देशमुख, वनरक्षक आणि श्रीमती ए एस उईके, वनरक्षक यांनी करून दाखविली. सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. एन. बुटे आणि डॉ. एस. पी. पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यशाळेचे आयोजक म्हणून प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. राहुल ढबाले, प्रा. भारत सोनकांबळे, श्री रितेश रामटेके यांनी कार्य केले. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.