वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

राकेश तेलकुंटलवार/ उपसंपादक 

वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली येथे विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

एटापल्ली: वन्यजीव संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उददेशाने वनपरिक्षेत्र कार्यालय, एटापल्ली यांच्यावतीने सात दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करुन वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर सप्ताहांतर्गत एटापल्ली येथिल विक्री आगार परिसरात गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वनवसाहत परिसरात वनकर्मचाऱ्यांनी श्रमदानातुन स्वच्छता अभियान राबविले.

विदयार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूगता निर्माण करण्यासाठी एटापल्ली

येथिल विविध शाळेमध्ये वन्यजीव विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विदयार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. वनसंवर्धन व जलसंधारणाच्या दृष्टिने वन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातुन कृष्णार येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी केली. तसेच मिश्र रोपवाटिका एटापल्ली येथे भगवंतराव कला व विज्ञान महाविदयालय एटापल्ली येथिल वनस्पतीशास्त्र या

विषयाच्या विदयार्थ्यासाठी रोपवाटिका या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्रातील विविध गावांमध्ये तसेच ग्रामसभांच्या माध्यमातुन वन्यजीव संवर्धन, वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांद्वारे स्थानिक

नागरिकांना वन व वन्यजीव संरक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. वन्यजीव सप्ताहाच्या समारोप प्रसंगी एटापल्ली गावातुन शालेय विदयार्थी व वनकर्मचाऱ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीच्या माध्यमातुन वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धानाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात आला.

यावेळी सप्ताहादरम्यान आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना पारितोषिके प्रदान करुन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर वन्यजीव सप्ताहाचे आयोजन भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री शैलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली श्रीमती निलिमा खोब्रागडे व वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडले.

वन वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण ही सामुहिक जबाबदरी असुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वनसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे हा संदेश या सप्ताहाच्या माध्यमातुन देण्यात आला.

थोडे नवीन जरा जुने