बांडीया नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; घटनास्थळी पंचनामा पूर्ण
एटापल्ली : तालुक्यातील बांडीया नदीच्या पात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली आहे. मासा पेंदा कूदयेटी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मासा पेंदा कूदयेटी यांचा बांडीया नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथील बांडीया नदीच्या किनाऱ्यावर पोहचून अधिकाऱ्यांनी घटनेची सविस्तर पाहणी केली व मौका चौकशी करून रीतसर पंचनामा केला.
पंचनाम्यादरम्यान घटनास्थळी ग्रामपंचायत अधिकारी संजय गेडाम, महसूल सेवक मोहन उसेंडी, संतोष चांदेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
एटापल्ली