पेरमिलीत ‘श्री गणेशा आरोग्य अभियान’ उत्साहात,आरोग्य तपासणी शिबिरात ५८ नागरिकांचा सहभाग

पेरमिलीत ‘श्री गणेशा आरोग्य अभियान’ उत्साहात,आरोग्य तपासणी शिबिरात ५८ नागरिकांचा सहभाग

पेरमिली : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत पेरमिली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिलीच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग गणेश मंडळ, पेरमिली यांच्या सहकार्याने बुधवार (२३) सप्टेंबर रोजी हे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात परिसरातील नागरिकांची रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच रक्त तपासणीसाठी आवश्यक नमुने घेण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना विविध आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन व समुपदेशन केले.

एएनएम भावना ठाकूर यांनी रक्तदाब व मधुमेह तपासणी केली. आरोग्य सेवक मयूर कोडापे यांनी नागरिकांचे आभा कार्ड तयार करून देण्यासह आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या आरोग्य शिबिरात पेरमिली परिसरातील एकूण ५८ नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली.

आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि जय बजरंग गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
थोडे नवीन जरा जुने