प्रभाग क्रमांक १० मधील जीर्ण व धोकादायक विहिरींच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
अहेरी, दि. २४ सप्टेंबर २०२६ :
प्रभाग क्रमांक १० मधील जीर्ण व धोकादायक अवस्थेत असलेल्या विहिरींची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट अहेरीच्या वतीने नगरपंचायत अहेरीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रभाग क्रमांक १० मधील संबंधित विहिरींची बांधकाम अवस्था खराब असून संरक्षक भिंतीची पडझड झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विहिरींच्या परिसरात लहान मुले व नागरिकांची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनाद्वारे विहिरींची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व मजबूत बांधकाम करणे, विहिरीभोवती संरक्षक भिंत/लोखंडी जाळी बसवणे तसेच सुरक्षित कठडे व इतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी आयुष मामीडवार – अहेरी शहर संघटक, विनेश तोटावार – शहर प्रमुख , बिरजु गेडाम – जिल्हा प्रमुख, वैद्यकीय मदत कक्ष, गोलू संगूवार – शिवसैनिक, दीपक संगमवार – शिवसैनिक तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते