भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विशेष प्रबोधन
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली आणि महावितरण कार्यालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 16 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त "विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत" या विषयावर विशेष प्रबोधन कार्यक्रम भगवंतराव महाविद्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्हि. ए. दरेकार होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री. सचिन कोहाड (उपकार्यकारी अभियंता, महावितरण विभाग एटापल्ली), मा.श्री. दिनेश थेरे (कनिष्ठ अभियंता महावितरण विभाग एटापल्ली), तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बी.डी. कोंगरे, डॉ. विनोद पत्तीवार, श्री. अजय बच्चुवार (तंत्रज्ञान, महावितरण विभाग), डॉ. निलेश दुर्गे, प्रा. भारत सोनकांबळे, डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. राहुल ढबाले, प्रा.अतुल बारसागडे इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. सचिन कोहाड यांनी विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर मा.श्री. दिनेश थेरे यांनी स्मार्ट सोलर योजनेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्हि. ए. दरेकार यांनी महावितरण विभागातील विद्युत पुरवठा विषय विविध समस्या आणि त्या कसे सोडवता येईल? याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी.डी. कोंगरे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन अजय दूर्वा आणि आभार प्रदर्शन ध्रुप मडावी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी, महावितरण कार्यालय एटापल्ली येथील कर्मचारी वृंद आणि महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Tags:
शिक्षण विभाग